भिंगारमधून दोन दुचाकींची चोरी

भिंगारमधून दोन दुचाकींची चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - भिंगारमधील कानडे मळा व निंबोडी येथून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या फिर्यादी भिंगार पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. कानडे मळा येथून मनिषा रघुनाथ आव्हाड (रा. सारसनगर, नगर) यांची दुचाकी (एमएच 16 यु 7746) चोरीला गेली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस नाईक नागरगोजे करीत आहे. दुचाकी चोरीची दुसरी घटना जामखेड रोडवरील निंबोडी शिवारात घडली. हॉटेल साई सम्राटसमोरून महादेव बन्सी भिंगारदिवे यांची दुचाकी (एमएच 16 एएस 1381) चोरीला गेली. भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com