दोन दुचाकींची चोरी

दोन दुचाकींची चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - सावेडी उपनगरातील गरूड हॉस्पिटलसमोरून सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने एक दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप विठ्ठल बेरड (रा. मेहकरी ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी (एमएच 16 एडी 2164) गरूड हॉस्पिटलसमोर उभी केली होती. त्याठिकाणाहून दुचाकी चोरीला गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुचाकी चोरीची दुसरी घटना स्नेहनगर येथील विठ्ठल मंदीराच्या पटांगणात घडली. मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास वसंत कोंडीराम उदावंत (रा. नागापूर) यांची दुचाकी (एमएच 16 एए 5447) चोरीला गेली. उदावंत यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com