दोन दुचाकींची चोरी

दोन दुचाकींची चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - केडगाव उपनगरातील हॉटेल संदीप जवळून एका व्यापार्‍याची दुचाकी (एमएच 16 बीके 29) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सोमवारी रात्री आठ ते मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. व्यापारी शुभम दीपक जगताप (रा. सारसनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक गायकवाड पुढील तपास करीत आहे.

दुचाकी चोरीची दुसरी घटना जीपीओ चौेकातील स्टेट बँकेसमोर घडली. सोमवारी दुपारी दोन ते पावणे चार वाजेच्या दरम्यान संतोष भाऊसाहेब मेढे (रा. भिंगार) यांची दुचाकी (एमएच 16 एजी 9615) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. मेढे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com