दोन दुचाकींची चोरी

दोन दुचाकींची चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - बुरूडगाव (ता. नगर) येथील एमएससीबी कॉलनीमधून मिलीद म्हतारदेव वायकर यांची दुचाकी (एमएच 16 इ 4059) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. वायकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दाणी करत आहे.

दुचाकी चोरीची दुसरी घटना बोल्हेगाव फाटा येथे घडली. अनिल दामोधर म्हसे यांची दुचाकी (एमएच 16 व्ही 3050) अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री चोरून नेली. म्हसे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक फौजदार महाजन करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com