तोफखाना हद्दीतून दोन दुचाकींची चोरी

तोफखाना हद्दीतून दोन दुचाकींची चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) - लॉक करून पार्क केलेली दुचाकी भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. नगर- मनमाड रोडवरील एका हॉटेलजवळ रविवारी दुपारी दोन ते चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नामदेव मारूती बडे (रा. तपोवन रोड, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांनी रविवारी दुपारी त्यांची दुचाकी (एमएच 17 एएस 879) मनमाड रोडवरील हॉटेलसमोर पार्क केली होती. तेथून ही दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तर

पाईपलाईन रोडवरील आहिल्यानगरी चौकातून प्रसन्न प्रदीप ईखे यांची दुचाकी (एमएच 16 बीजी 7898) चोरीला गेली. शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी ईखे यांनी तोफखान्यात फिर्याद दिली आहे. बागडपट्टी येथून प्रदीप सिद्धेश्‍वर वाव्हळ यांची सायकल चोरीला गेली. त्यांनीही तोफखान्यात फिर्याद दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com