दोन दुचाकींची चोरी

दोन दुचाकींची चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) - दोन दिवसांत कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या. दोन्ही दुचाकी दिवसा चोरीला गेल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येते. मार्केटयार्डच्या मेन गेटसमोरील चहाच्या टपरीजवळ लावलेली दुचाकी (एमएच 16 सीटी 2689) रविवारी दुपारी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

या प्रकरणी बाबासाहेब अंबु बनकर (रा. कोल्हेवाडी ता. नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. दुचाकी चोरीची दुसरी घटना कायनेटिक चौकातील इलाक्षी शोरूमसमोर घडली.

सादीक लालासाहेब पठाण (रा. उक्कडगाव सांडवे ता. नगर) यांची दुचाकी (एमएच 16 सीएन 9689) सोमवारी दुपारी दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान चोरीला गेली. पठाण यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com