दहा लाखाची लूट करणारा संशयित हमाल जेरबंद

दहा लाखाची लूट करणारा संशयित हमाल जेरबंद

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जतच्या (Karjat) एका आडत दुकानदाराने बँकेतून (Bank) आणलेली दहा लाखांची रोकड त्यांच्याकडे काम करणार्‍या दोन हमालांनीच बॅग हिसकावून पळवुन नेल्याची घटना घडली होती. या घटनेतील संशयिताला गजाआड करण्यात कर्जत पोलिसांना (Karjat Police) यश आले आहे.

प्रमोद विजय आतार, (19, रा.कोरेगाव ता. कर्जत) असे अटक (Arrested) करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तर मुख्य संशयित सोमनाथ विठ्ठल साळुंखे (27, रा. कारेगाव) हा अद्याप फरार आहे. या प्रकरणी पियुष रविंद्र कोठारी यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) येथे आडत दुकान आहे. 4 ऑक्टोबर रोजी शेतकर्‍यांकडुन खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्यासाठी दहा लाखांची रक्कम कर्जत येथील अर्बन बँकेतून (Urban Bank) काढून बॅगमध्ये घेऊन मोटारसायकलवर ते मार्केटकडे येत होते.

कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर त्यांच्याच दुकानात हमालीचे काम करणारे कामगार सोमनाथ साळुंख व प्रमोद आतार यांनी पियुष कोठारी यांच्या मोटारसायकलवर असलेली बॅग (Bag) हिसकाऊन पळवून नेली होती. प्रमोद विजय आतार हा 29 रोजी पोलिसांच्या गळाला लागला असुन त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. न्यायालयाने त्यास 8 नोव्हेंबरपर्यंत 9 दिवसांची पोलीस कोठडी (Police Cell) सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, सचिन वारे हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com