आडगाव बुद्रुक येथून सोयाबीनची चोरी

आडगाव बुद्रुक येथून सोयाबीनची चोरी

पिंपरी निर्मळ | वार्ताहर

राहाता तालुक्यातील आडगाव ब्रुद्रुक येथील बेदं वस्तीवरील दोन शेतकऱ्यांची पंधरा क्वीटंल खळ्यावरील सोयाबीन चोरटयांनी चोरून नेली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरठा आहे. लोणी पोलिसांनी परीसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

राहाता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आडगाव ब्रु येथील बेंद वस्तीवरील भिमराज जगन्नाथ शेळके यांची तीन क्वी.व बाळासाहेब रामचंद्र शेळके यांची बारा क्वी.सोयाबीन चोरटयांनी चोरून नेली.

लोणी-आडगाव रोडच्या कडेला असणाऱ्या वस्ती वरील घराशेजारी असणाऱ्या खळ्यावर दोघांनीही सोयाबीन वाळायला टाकली होती. संध्याकाळी बारदाण्याखाली झाकुन ठेवलेली सोयाबीन चोरटयांनी गोण्यामध्ये भरून नेली. चालु बाजार भावानुसार दोघांचे मिळुन पाऊन लाखाची चोरी झाली आहे. शेतात काबाड कष्ट करून ऐन दिवाळी सनाच्या तोंडावर सोयाबीनची चोरी झाल्याने दोनही शेतकरी व कुटुंबीय हळहळ करीत आहेत.

लोणी पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार देवुन चार दिवस उलटुनही अदयाप तक्रार झालेलीं नसल्याची माहीती मिळाली त्यामुळे लोणी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी बाबद कीती तत्पर आहे यांचा अंदाज येतो. या चोऱ्यांमुळे परीसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी तातडीने या चोरीची चौकशी करावी व परीसरात गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com