दुकानाचे शटर तोडून आठ लाखांच्या तांब्याच्या तारेची चोरी

दुकानाचे शटर तोडून आठ लाखांच्या तांब्याच्या तारेची चोरी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

दुकानाचे कुलूप तोडून आठ लाखांच्या तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरून नेली. महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या व्यापारी संकुलातील गाळा क्रं .11 मधील रामदास माधव राजुडे यांच्या मालकीच्या श्रीराम मोटर्स या दुकानात ही चोरीची घटना घडली.

तालुक्यातील नाटेगाव येथील मूळ रहिवासी असलेले व्यापारी व इलेक्ट्रीक मोटार दुरुस्तीचा व्यवसाय असलेले कुशल दुकानदार यांचा भाडे तत्त्वावरील व्यापारी गाळा आहे. ते नेहमीप्रमाणे काल सायंकाळी आपले दुकान बंद करून गेले असता आज सकाळी त्यांना त्यांच्या एका ओळखीच्या इसमाचा फोन आला व त्याने तुमच्या गाळ्याचे शटर लावण्याचे कुलूपाजवळ छंणीने तोडून आत काही तरी गडबड झालेली दिसत असल्याचा दूरध्वनी आला.

दुकानदार रामदास राजुडे त्यावेळी दुकानात येतच असताना त्यांना ही खबर मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्याठिकाणी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गाळ्यास कुलूप अडकविण्याच्या धातूच्या पट्ट्या अज्ञात हत्यारांच्या साहाय्याने तोडून आतील बर्‍याच वस्तूंची फेकाफेक केलेली आढळून आली. त्यांनी बारकाईने त्याबाबत शोध घेतला असता त्यांच्या इलेक्ट्रिक मोटार भरण्याची तांब्याच्या धातूची सुमारे सातशे ते आठशे किलो तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आढळून आली आहे. त्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कोपरगाव शहर पोलिसांत धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com