भिंगारमधून दुचाकीची चोरी

भिंगारमधून दुचाकीची चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - भिंगारमधील कॅबलरी मेस जॉगिंग पार्क येथून एक दुचाकी चोरीला गेली. बुधवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सुनील काशिनाथ शेरफल (वय 50 रा. सुदर्शन कॉलनी, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी (एमएच 16 बीपी 3353) बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जॉगिंग पार्क येथे उभी केली होती. यानंतर एक तासामध्ये दुचाकीची चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक द्वारके करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com