अहमदनगर (प्रतिनिधी) -

डुप्लिकेट चावीने लॉक उघडून घरातील 66 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शहरातील गाझीनगरमध्ये

ही चोरी झाली. मुजाहिद जावेद बागवान यांनी कोतवाली पोलिसांत तक्रार दिली आहे. गाझीनगरमधील सॉ मिल समोर बागवान यांचे घर आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप डुप्लिकेट चावीचा वापर करून उघडले.

घरातील सामनाची उचकापाचक करत लॉकरमध्ये असलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा 66 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.