
अहमदनगर (प्रतिनिधी) -
बालिकाश्रम रोडवरील वाघ मळ्यातून चोरट्यांनी 13 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. गत आठवड्यात घडलेल्या या चोरीचा
गुन्हा काल तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पुनम दीपक घाडगे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. घाडगे या ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतात. चोरट्यांनी त्यांच्या वाघ मळ्यातील घरात चोरी करत 1 लाख 54 हजार रुपयांचे 13 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.
25 ते 27 फेबु्रवारी दरम्यान ही चोरी झाली. घाडगे यांच्या लग्नाचे तसेच त्यांच्या आईचे दागिने त्यांनी घरातील कपाटात ठेवले होते. चोरट्यांनी घरफोडी करत कपाटातील हे दागिने लंपास केले. तोफखाना पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.