नगर तालुक्यातील मंदिरात चोरीचे सत्र

जेऊर, इमामपूरातील मंदिरात एकाच रात्री चोरी
नगर तालुक्यातील मंदिरात चोरीचे सत्र

अहमदनगर|Ahmedagar

नगर तालुक्यात (Nagar Taluka) चोरट्यांनी (Thieves) धुमाकूळ घातला आहे. चोर्‍या, घरफोड्या (Burglary) बरोबर आता मंदिराकडे (Temple) चोरट्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. जेऊर बायजाबाई (Jeur Baijabai), इमामपूर (Imampur) शिवारातील मंदिरे चोरट्यांनी लक्ष केली आहे. रविवारी मध्यरात्री मंदिरामध्ये चोरी (Theft in the Temple) करत विविध वस्तू चोरून नेल्या आहेत.

नगर तालुक्यातील मंदिरात चोरीचे सत्र
पेरूची फोड झाली गोड

जेऊर गावातील ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तांब्याची भांडी, कळशी, समई, पंचपाळे, ताट याची चोरी केली. तसेच इमामपूर येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात तीन किलो वजनाचा पितळी घोडा (Brass Horse), तसेच पाच किलो वजनाची एक घंटा व सात किलो वजनाच्या दोन घंटा (Bell) चोरट्यांनी चोरून नेल्या. इमामपूर येथील मळगंगा माता मंदिरातील एक समई व दोन घंटा तसेच इमामपूर घाटातील गणपती मंदिर येथील समई व दोन घंटा चोरून नेल्या आहेत.

घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद जाधोर, दीपक गांगर्डे, कावरे यांनी भेट दिली. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com