के. के. रेंजमध्ये चोरी

के. के. रेंजमध्ये चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - विळद (ता. नगर) शिवारात खोपेश्‍वर येथील के. के. रेजमधून चोरट्यांनी अ‍ॅम्पिअर, अ‍ॅल्युमिनिअम पट्ट्या, दोन कॅपॅसीटर केबल असा तीन हजार 800 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

ही घटना रविवारी रात्री साडेनऊ ते सोमवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी के. के. रेजचे अधिकारी मुकेश कुमार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनास्थळी सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस नाईक गांगुर्डे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com