18 लाखाच्या साहित्यासह ट्रक चालकानेच केला लंपास

सुपा पोलीसांनी 24 तासात मुद्देमाल केला हस्तगत
18 लाखाच्या साहित्यासह ट्रक चालकानेच केला लंपास

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

18 लाखाचे एअर कंडिशन भरलेला ट्रक (Tuck) चालकानेच पळवल्याचा प्रकार समोर आला. सुपा पोलीसांनी (Supa Police) सुत्र फिरवत अवघ्या 24 तासात चोरीचा छडा लावून श्रीरामपुर (Shrirampur) येथून साहित्य व ट्रक (Truck) असा 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी केली.

किशोर गोरक्षनाथ तर्‍हाळ (रा. कारेगाव, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मधुकर मोहनराव तांबे (रा, औरंगाबाद ) यांनी सुपा पोलिसांत (Supa Police) फिर्यादीत दिली आहे. यात म्हटले आहे की, बुधवारी ( दि. 8) दुपारी त्यांचा ट्रक (नं. चक 16 -ए 0710) हा गाडी चालक किशोर तर्‍हाळ याने लोणीकंद (Lonikand), पुणे (Pune) येथुन औरंगाबाद (Aurangabad) येथील रॉयल रिफ्रेजेशन कंपनीचा माल घेवुन औरंगाबाद येथे जाण्यास निघाला होता.

परंतु तो कंपनीत पोहचला नसल्याचे कंपनीने कळवले. चालकाच्या घरीही तो आला नसल्याचे समजले. अखेर पुणे-अहमदनगर महामार्गावर (Pune-Ahmednagar Highway) ट्रकचा शोध घेताना सुपा टोलनाका (Supa Toll plaza) येथे 8 जुनलाच रात्री 9.45 वा. ट्रक येथून पास झाल्याचे सांगितले. यामुळे तांबे यांनी सुपा पोलीस ठाण्यात (Supa Police Station) तक्रार दाखल केली. सुपा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सुपा टोल नाक्याचे फुटेज तपासून बिनतारी संदेशा यंत्रनेद्वारे सर्व पोलीस ठाण्यांना कळवले.

ठिकठिकाणी सि सी टिव्ही फुटेज पहात सुपा पोलिस (Supa Police) राहुरी (Rahuri) येथे पोहचले असता सदर मालासह चोरीला गेलेला ट्रक सुपा पोलिसांना (Supa Police) आढळून आला. पोलीसांनी मालासह ट्रक हस्तगत केला. सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनखाली सुनिल कुटे, मरकड, खंडेराव शिंदे, चौधरी, यंशवत ठोबरे यांनी ही कामगिरी केली. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com