चोरट्यांच्या निशाण्यावर शेतकर्‍यांची जनावरे, इलेक्ट्रीक मोटारी

'या' तालुक्यात घटना वाढल्या || ठरावीक टोळ्या सक्रिय
चोरट्यांच्या निशाण्यावर शेतकर्‍यांची जनावरे, इलेक्ट्रीक मोटारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील गावामध्ये चोरी, घरफोडीच्या घटनामध्ये कमालीची वाढ झाली आहे. ग्रामीण भागातून जनावरे, शेतकर्‍यांच्या शेतातील वस्तू, दुचाकी चोरीच्या घटना दररोज घडत आहेत. ठरावी टोळ्या सक्रिय असण्याची शक्यता असून त्याचा शोध मात्र पोलिसांना अद्याप लागलेला नाही. नगर तालुक्यासाठी दोन पोलीस ठाणे येतात.

एमआयडीसी व नगर तालुका पोलीस ठाण्याला नगर तालुक्यातील गावे जोडली आहेत. वाडी-वस्तीवर राहणार्‍या लोकांचे प्रमाणही जास्त आहे. गेल्या महिन्याभरात शेतकर्‍याच्या शेतामधून इलेक्ट्रीक मोटारी, स्टॅर्टर, केबल व इतर शेती उपयोगी साधने चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या. मध्यंतरी नगर तालुका पोलिसांनी इलेक्ट्रीक मोटारी चोरणार्‍यांना अटक केली होती. तरीही या घटना थांबायला तयार नाही. दुसरीकडे शेतकर्‍यांच्या गोठ्यांमधून शेळ्या, गाई चोरीला जात आहेत. याचे प्रमाणाही गेल्या महिन्याभरात वाढले आहेत.

जनावरांचे चोरी करणार्‍यांचा शोध मात्र एमआयडीसी, नगर तालुका पोलिसांना अद्याप लागलेला नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसही यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. चोरी, घरफोडीच्या घटनाही सुरूच आहे. ठरावीक टोळ्यांकडून जनावरे व शेतकर्‍याच्या शेतातील मोटारी चोरून अन्य ठिकाणी विक्री केल्या जात असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी याकडे लक्ष दिल्यास अशा चोर्‍या करणार्‍या टोळ्या पकडल्या जावू शकतात. मात्र पोलिसांकडून तसे होताना दिसून येत नाही.

मंदिरांच्या दानपेट्या, दुकान फोडले

किराणा दुकान फोडून सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह 20 हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरीला गेले. कौडगाव येथे ही घटना घडली. कौडगावातील प्रवीण किराणा दुकानाच्या पाठीमागील गोडावूनचा लाकडी दरवाजा चोरट्यांनी मंगळवारी रात्री 8 ते बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान फोडला. दुकानात घुसून खारीक, बदाम, काजू, खजूर, साबण, तेलाचे डब्बे, सिगारेट, गल्ल्यातील रोख रक्कम, सीसीटीव्ही कॅमेरे, मशिन, स्क्रीन असा 20 हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला. दुकानाचे मालक भिमा पांडुरंग काळे (वय 62, रा. कौडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खातगाव टाकळी (ता. नगर) गावातील दोन मंदिरांच्या दानपेट्या फोडण्यात आल्या. सुमारे 45 हजार रूपये चोरीला गेले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खातगाव टाकळी गावातील गोरक्षनाथ मंदिर आणि तुळजाभवानी मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी मंगळवारी रात्री 6 ते बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान फोडली. सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक काशिनाथ केशव पठारे (वय 78) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com