
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
चोरीच्या दुचाकी (Theft Bike) व मोबाईल विक्री (Mobile Sales) करण्यासाठी बीड (Beed) येथे घेऊन जात असताना तिघांना कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) पकडले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आपल्या पथकासह इम्पिरियल चौकात नाकाबंदी करून वाहनांची झडती घेत असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
तिघांपैकी दोघे अल्पवयीन असून, सनि जितेंद्रसिंग गोवे (वय 19, रा. चिंचोली, ता. पाटोदा जि.बीड) असे तिसर्या संशयित आरोपीचे (Accused) नाव आहे. शहरातील इम्पेरियल चौकात 25 ऑगस्ट रोजी कोतवाली पोलिसांनी वाहनांची झडती घेण्यासाठी नाकाबंदी केली होती. निरीक्षक यादव यांना दुचाकीवरून येत असलेल्या तिघांवर संशय आल्याने त्यांनी तिघांना अडवून झडती घेतली असता चोरीतील एक दुचाकी व चार मोबाईल मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता पुणे (Pune) जिल्ह्यातील रांजणगाव (Ranjangav) शिरूर (Shirur) आणि भीमा कोरेगाव (Bhima Koregav) परिसरातून मोबाईल चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. चोरीतील हा मुद्देमाल विक्री करण्यासाठी बीड (Beed) येथे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. दुचाकी व चार मोबाईल असा 90 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे.
निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे, पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, तनवीर शेख, गणेश धोत्रे, राम हंडाळ, सतीश भांड, गणेश ढोबळे, विजय गावडे, संतोष बनकर, अर्जुन फुंदे, अब्दुलकादर इनामदार, सलीम शेख, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.