माळीवाडा येथील शनिमंदीरात चोरी

माळीवाडा येथील शनिमंदीरात चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - शहरातील माळीवाडा वेस येथील शनि मंदीरामध्ये चोरट्यांनी चोरी करत दानपेटी, चांदीची कपाळ पट्टी व डोळे, काळ भैरवनाथ महाराज व जोगेश्‍वरी मातेचे डोळे असा सात हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

शनिवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंदीराचे पुजारी अनंत अनिल पांडे (रा. बांबु गल्ली) यांनी फिर्याद दिली आहे.

चोरट्याने जाळीवरून उडी मारून मंदीरातील आतील दरवाजाचे कडीकोयंडा तोडला. शनि मंदीरातील दानपेटी, चांदीची कपाळ पट्टी, डोळे तसेच भैरवनाथ महाराज, जोगेश्‍वरी मातेचे डोळे चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतिश शिरसाठ करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com