चोरीचा बनाव करणाराच निघाला आरोपी

चोरीचा बनाव करणाराच निघाला आरोपी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील कोकणगाव ग्रामपंचायतीच्या (Kokangav Grampanchayat) मालकीची पाणी वाटपाची रोख रक्कम हडप करण्यासाठी जबरी चोरीचा (Theft) बनाव करणारा फिर्यादीच आरोपी निघाल्याचे पोलीस तपासात (Police Investigation) निष्पन्न झाले आहे. जबरी चोरीचा बनाव करणारा व त्याचा साथीदार अशा दोघांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. ही कारवाई संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी (Sangamner Sub-Divisional Police Officer) यांच्या पथकाने केली आहे.

चोरीचा बनाव करणाराच निघाला आरोपी
मुसळधार पावसाने साईबाबा मंदिराच्या मुखदर्शनाजवळील मंडप कोसळला

अजय अर्जुन जोंधळे (वय 24, रा. कोकणगाव, ता. संगमनेर), विजय राजेंद्र पारधी (वय 22, रा. शिवापुर, कोकणगाव, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी की, अजय अर्जुन जोंधळे (वय 24 वर्षे, रा. कोकणगाव, ता. संगमनेर) याने संगमनेर शहर पोलीस स्टेशन (Sangamner Police Station) येथे फिर्याद दिली की, दि. 17/06/2022 रोजी रात्री 09-30 वा. सुमारास ज्ञानमाता शाळे जवळवुन संगमनेर (Sangamner) येथे लोणी रोडने कोकणगाव (Loni Road Kokangav) येथे जाण्यासाठी रोडचे कडेला गाडीची वाट पाहत उभा असताना तीन अनोळखी इसमांनी त्याला जबर मरहाण करुन फिर्यादीचे पॅन्टचे खिशामध्ये ग्रामपंचायत कार्यालय कोकणगाव यांचे मालकीचे पाणी वाटपाची 9 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली. याबाबत फिर्याद दिल्याने संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 436/2022 भारतीय दंड संहिता 394, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

चोरीचा बनाव करणाराच निघाला आरोपी
रतनवाडीत 131 मिमी पाऊस

सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या त्यांच्या पथकास आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना केल्या. पोलिस पथकाने गुन्हा घडला त्या ठिकाणाच्या व आजुबाजुच्या सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले व तांत्रीक तपास केला असता सदरचा गुन्हा घडलेला नसुन फिर्यादीनेचे ग्रामपंचायत, कार्यालय कोकणगाव यांचे मालकीची रोख रक्कम हडप करण्यासाठी सदरचा गुन्ह्याचा बनाव केल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादीस ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. सदरचा बनाव करणे करीता त्याचा साथीदार विजय पारधी याने मदत केल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी विजय राजेंद्र पारधी (वय 22, रा. शिवापुर, कोकणगाव, ता. संगमनेर) यास ताब्यात घेवुन त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदरचा बनाव केल्याची कबुली दिली आहे. पोलीस पथकाने सदरच्या दोन्ही आरोपींना संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

चोरीचा बनाव करणाराच निघाला आरोपी
500 कोटींचा गंडा घालणारा ठग बेळगाव पोलिसांच्या ताब्यात

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकातील पोलीस नाईक आण्णासाहेब दातीर, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे यांनी केली असुन गुन्ह्याचा अधिक तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या करत आहे.

चोरीचा बनाव करणाराच निघाला आरोपी
भाजपची खेळी त्यांच्यावरच....!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com