चोरीच्या विविध गुन्ह्यातील सात आरोपी गजाआड, सुमारे 4 लाखांचा ऐवज हस्तगत

चोरीच्या विविध गुन्ह्यातील सात आरोपी गजाआड, सुमारे 4 लाखांचा ऐवज हस्तगत

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले पोलिसांनी मोटर सायकल, इलेक्ट्रिक मोटारी, तसेच मंदिराच्या दानपेट्या फोडून भाविकांचे दान लांबविणार्‍या सात चोरट्यांस मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून 16 मोटरसायकली, पाच इलेक्ट्रिक मोटर तसेच चोरीतील 3 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार सागर विश्वनाथ मेंगाळ, हर्षल संजय मेंगाळ (दोघेही रा. केळी- रुम्हणवाडी ता. अकोले) या दोंघानी इलेक्ट्रीक मोटार व मोटार सायकल चोरी करुन त्याची विल्हेवाट लावणार असले बाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने या दोन इसमांना ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे तपास केला.

याच तपासात त्यांचे साथीदार सोमनाथ शिवाजी भुंताबरे, सुभाष रघुनाथ आगविले, दोन्ही रा चिंचाचीवाडी, समशेरपुर ता. अकोले, भास्कर खेमा पथवे रा. नांदुरी दुमाला ता. संगमनेर, दिलीप पांडुरंग मेंगाळ केळी -रुम्हणवाडी ता. अकोले, हे या चोर्‍यामध्ये सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यावरुन संबंधित इसमांना ताब्यात घेतले. त्यांनी मोटार सायकल इलेक्ट्रीक मोटार चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस स्टेशन कडील गुन्ह्यामध्ये अटक करुन त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करुन घेवुन या रिमांड कालावधीमध्ये त्यांचेकडुन एकुण 3 लाख 20 हजार रुपयांच्या एकूण 16 मोटार सायकल व 55,000 रुपयांच्या एकुण 5 इलेक्ट्रीक मोटार असा मुद्देमाल हस्तगत केला.

सोमनाथ शिवाजी भुंताबरे, भास्कर खेमा पथवे, सुभाष रघुनाथ आगविले अशांनी मिळून मंदिरामध्ये चोरी केलेल्या रक्कम व मुद्देमालापैकी कोतुळेश्वर महादेव मंदिरातील दान पेटी मधील 2,000 रुपये रोख व पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी मंदिरामधील 10,000 रुपये किमतीच्या पादुका हस्तगत करण्यात यश आलेले आहे. तसेच ब्राम्हणवाडा येथे रात्रगस्त दरम्यान स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मिळुन आलेला संशयीत इसम विजय लक्ष्मण काठे रा. रंधा, ता अकोले यास ताब्यात घेवून त्यास अटक केली असता अटके दरम्यान त्याचेकडुनही विविध गुन्ह्यातील 3 मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदर आरोपी यांचेकडून एकुण 3 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले असून अकोले पोलीस स्टेशन मध्ये विविध दाखल गुन्हे यानिमित्ताने उघडकीस आले आहे. अकोले पोलीस ठाणे हद्दीत व परिसरात केलेले आणखीनही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक भुषण हांडोरे, महिला उपनिरीक्षक फराहनाज पटेल, हवालदार हरिदास लांडे, पोलीस नाईक अजित घुले, पोना रविंद्र वलवे, पोना गोराणे, चालक पोना गोविंद मोरे, पोना सोमनाथ पटेकर, पोना किशोर तळपे, पोना विठ्ठल शेरमाळे, पोना राजेंद्र कोरडे, पोना बाबासाहेब बड़े, पोकॉ प्रदिप बढे, पोकॉ संदिप भोसले, पोकॉ विजय खुळे, पोकॉ आत्माराम पवार, पोकॉ सुयोग भारती, कॉन्स्टेबल अविनाश गोडगे, पोकॉ गणेश शिंदे, पोकॉ राहुल क्षीरसागर, पोकॉ विजय आगलावे, पोकॉ कुलदिप पर्बत, पो. ना. फुरकान शेख यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com