हॉटेलमध्ये काम करणारा तरुण आता 25 कोटींचा झाला मालक

राहात्याच्या तरूणाचा अमेरिकेत मराठी बाणा चमकवित तरुणांपुढे आदर्श
हॉटेलमध्ये काम करणारा तरुण आता 25 कोटींचा झाला मालक

राहाता |वार्ताहर| Rahata

अमेरिकेत (America) हॉटेलमध्ये (Hotel) काम करणार्‍या राहात्यातील तरूणाने 25 कोटी रुपयाचे हॉटेल खरेदी (Hotel Purchase) करून अमेरिकेत (America) मराठी बाणा चमकवित तरुणांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

राहाता (Rahata) येथील माजी सैनिक व सध्या साईबाबा संस्थान (Sai Baba Trust) शिर्डी (Shirdi) येथे बंदूकधारी म्हणून नियुक्त असलेले वसंत सदाफळ यांचा चिरंजीव निखिल सदाफळ या तरुणाने अमेरिका (America) येथे दिल्ली येथील सनी कपूर यांना बरोबर घेऊन 25 कोटी रुपयाचे हॉटेल खरेदी (Hotel Purchase) करून परदेशात मराठी बाणा (Marathi Bana) चमकवीला आहे.

निखिल याने अडीच वर्षा पूर्वी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण (Hotel Management Education) पूर्ण करून अमेरिकेत नोकरीसाठी गेला. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर स्वतःचे हॉटेल खरेदी करून मराठी तरुणांना हेवा वाटेल असे कार्य करून दाखविले. सध्याचे युगात अनेक तरुण शिक्षण घेऊन बेरोजगार आहे. परिणामी अनेकांना नोकरी मिळत नाही. परंतु कुठल्याही क्षेत्रात आवड निर्माण झाली तर यश हमखास मिळते हे या तरुणाने दाखवून दिले आहे.

निखिलचे प्राथमिक शिक्षण येथील सेंट जॉन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी अकरावी व बारावी शारदा विद्या मंदिर येथे पूर्ण केली. बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात आवड असल्याने त्याने नगर येथील न्यू आर्ट्स कॉलेज येथे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला. कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत गेल्याने. त्याला ट्रेनिंगसाठी महाबळेश्वर व म्हैसूर या ठिकाणी पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठवण्यात आले.

16 तास त्या ठिकाणी काम करून सर्व गोष्टींचा अभ्यास त्याने केला. त्यानंतर त्याची अमेरिका येथे नोकरीसाठी निवड करण्यात आली. परदेशात नोकरी करत असताना आपल्या भारत देशातील तरुणांचे या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय सुरू करून भारतीय तरुणांसाठी आदर्श निर्माण करावा, अशी मनाशी त्यांनी खूणगाठ बांधली होती. अमेरिका येथे हॉटेल घेण्यासाठी दाढ येथील महेंद्र सिनारे यांची मोठी मदत झाली. सिनारे यांनी दिल्लीतील सनी कपूर यांची ओळख करून घेऊन करोना काळात त्याला काम मिळवून दिले.

26 डिसेंबरला निखिल व सनी कपूर यांनी अमेरिका येथे 25 कोटी रुपयांचे हॉटेल खरेदी केले आहे. निखिल यांची बहीण गुजरात या ठिकाणी एक नामांकित कंपनीत डेप्युटी मॅनेजर या पदावर काम करत आहे. अमेरिकेत हॉटेलमध्ये काम करणार्‍या तरुणाने जिद्द व चिकाटी या जोरावर स्वतःचे हॉटेल खरेदी करून परदेशात मराठी बाणा चमकविल्याने या युवकाचे राहाता परिसरातून कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com