तरुणाने बिबट्याच्या हल्ल्यातून शेळीला वाचविले

तरुणाने  बिबट्याच्या हल्ल्यातून शेळीला वाचविले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

पंधरा दिवसांपूर्वी शहरातील बिबट्याचा थराराची घटना ताजी असतानाच काल दुपारी गायकवाड वस्ती परिसरात शेतात चरणार्‍या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. परंतू तरुणाने प्रसंगवधान राखत शेळीला बिबट्याच्या तावडीतून सोडविले.

श्रीरामपूर परिसरातील गायकवाड वस्ती या ठिकाणी रविंद्र खरे हे गा-पालनाचा तसेच शेळी पालनाचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे त्यांचा मुलगा आशिष खरे शेळ्या चारण्यासाठी परिसरातील मोकळ्या शेतात घेऊन गेला असता तळ्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळीवर हल्ला केला. यावेळी शेळीचा जोरात ओरडण्याचा आवाज आल्याने प्रसंगावधान राखत अशिष खरे त्याने काठीच्या साह्याने बिबट्याच्या जबड्यातून शेळीला ओढले. यावेळी बिबट्याने गुरगुरत आशिष खरे याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी खरे याने शेळीला ओढत तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी शेतातून घरी आणले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शेळीच्या मानेभोवती बिबट्याने पकडल्याने मोठी जखम झाली आहे. जखमी शेळीवर डॉ. राशिनकर यांनी उपचार केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com