तरुणाने प्लाझ्मा दान करुन रुग्णाला दिले जीवदान

तरुणाने प्लाझ्मा दान करुन रुग्णाला दिले जीवदान

नेवासा (तालुका प्रतिनिधी) - नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील मंगेश गोरक्षनाथ नवले (वय 31) या कृषी पदवीधर तरुणांने स्वतः प्लाझ्मा दान करून एका रुग्णाला जीवदान दिले.

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्यात ऊस विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मंगेश नवले यांना मागील महिन्यात करोना झाला होता. त्यातून ते पूर्ण बरे झाले आहेत.

याबद्दल माहिती देतांना मंगेश म्हणतो की, गेल्या आठवड्यात विचार आला, या काळात समाजासाठी आपण काय करू शकतो आणि पोस्ट केली प्लाझ्मा पाहिजे असेल तर कळवा.

काल अचानक फोन आला,मित्राचे वडील सिरीयस आहेत. स्कोर 23 आहे, डॉक्टरने प्लाझ्मा ट्रीटमेंट शेवटचा पर्याय सांगितला आहे. एवढा फोन ऐकला आणि कुणासाठी लागतो? कुठे लागतो? हे न विचारता लगेच तयारी दर्शवली. सदरील व्यक्ती मला जनकल्याण रक्तपेढी नगरला घेऊन आली. त्यांनी सोबत चार डोनर आणले होते. त्यातील फक्त माझा सॅम्पल व्यवस्थित आल्याने मला प्लाझ्मा डोनेशनची संधी मिळाली.

मंगेश म्हणतो, समाजाची परिस्थिती समजून घ्या आणि स्वयंस्फुर्तीने प्लाझ्मादानासाठी पुढे या. करोना झाल्यावर आपण 40 दिवसानंतर कधीही प्लाझ्मा देऊ शकतो आणि एकदा दिल्यावर पुन्हा 15 दिवसांनी देऊ शकतो काहीही त्रास होत नाही.

आयुष्यच समाधान काय असत त्याचा अनुभव आज आला एखाद्याचा जीव वाचण्यासाठी माझ्या हातून झालेला छोटासा प्रयत्न म्हणजेच खर्‍या आयुष्याचं सुख आहे. प्लाझ्मा दानाची ही संधी दिल्याबद्दल मंगेशने डॉ.अरविंद पोटफोडे, महेश नवले, पत्नी सरला नवले, सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर, अभिजित नवले यांचे आभार मानले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com