अहमदनगर : कामगार पती-पत्नीने घरातून चोरले साडेसहा लाख

मालकाची पोलिसात धाव
अहमदनगर : कामगार पती-पत्नीने घरातून चोरले साडेसहा लाख

अहमदनगर|Ahmedagar

शहरातील एका व्यवसायिकाकडे कामगार म्हणून असणार्‍या पती- पत्नीने घरातून अडीच वर्षामध्ये सहा लाख 37 हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. घरातून वेळोवेळी रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संबंधीत पती-पत्नी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केेला आहे.

गणेश पंडीत साळवे, सरला गणेश साळवे (दोघे रा. डॉक्टर कॉलनी, बुरूडगाव रोड, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. व्यवसायिक हरिषचंद्र कृष्णाजी मते (वय 71 रा. डॉक्टर कॉलनी, बुरूडगाव रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचा गॅस व्यवसाय आहे. त्यांच्याकडे साळवे दांपत्य कामाला होते. 4 सप्टेंबर 2018 ते 25 मे 2021 या कालावधीत साळवे दांपत्यांनी फिर्यादी यांच्या घरातून संगणमताने सहा लाख 37 हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली. 25 मे रोजी ही घटना उघडकीस आली.

यानंतर काल (बुधवार) कोतवाली पोलीस ठाण्यात साळवे दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी शहर उपअधीक्षक विशाल ढुमे, सहायक निरीक्षक हेमंत भंगाळे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार देवराम ढगे करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com