विघ्नसंतोषींकडून दंगे भडकवण्याचे काम - उपमुख्यमंत्री पवार

विघ्नसंतोषींकडून दंगे भडकवण्याचे काम - उपमुख्यमंत्री पवार

जामखेड | तालुका प्रतिनिधी

महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने सर्वाना बरोबर घेऊन काम करत आहे. पण हे चांगले काम विघ्नसंतोषी लोकांना ते पहावत नाही म्हणून सतत काहीतरी कुरापती काढून दंगल हिंसा भडकवत आहेत. मात्र जनतेने अशा दिशाभूल करणार्‍या समाजकंटापासुन सावध राहावे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

जामखेड येथे आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, केंद्र शासन राज्याला मदत करण्याऐवजी कुरघोडीचे राजकारण करत आहे. शिखर बँकेच्या सहकार्याने शेतकर्‍यांना लवकरच शुन्य टक्के व्याजाने पाच लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. विज ही कोणाची मक्तेदारी नाही. 70 हजार कोटींची बिले थकली आहेत. सर्वांनी बीले भरली पाहिजेत एकटे सरकार काही करू शकत नाही. कर्जत जामखेडची जनता सुज्ञ आहे कोण विकास करणार हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे त्यामुळे पोकळ गप्पा मारणार्‍यांना घरी बसवले आहे. पुर्वी येथे मंत्री असुनही कामाचा दर्जा निकृष्ट होता. एसटी संपाविषयी आरक्षण विषयी बोलताना सांगितले की कोणी आत्महत्या करू नये सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.

यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, आमदार कसा असावा हे कर्जत जामखेडकडे पाहुन सांगता येते. रोहित पवार विकासकामाने झपाटलेला आहे. त्यांनी संपुर्ण कामाचा आराखडा तयार केला आहे. महाविकास आघाडी सरकार च्या काळात विकासासाठी निधी कमी पडणार नाही.

विखेंकडे बोट

कर्ज वाटपात जिल्हा बँकेकडून कर्जत-जामखेड तालुक्यांबाबत दुजाभाव केला जात असून याकडे आपल्याला पाहावे लागेल. असे बोलत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्ष माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांना लक्ष केले. उदय शेळके तसेच इतर ज्येष्ठ संचालकांना याबाबत आपण विचारणार असल्याचेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com