नेवासा-शेवगाव रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम अखेर सुरू

नेवासा-शेवगाव रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम अखेर सुरू

नेवासा | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील प्रहार, भाजप सह विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा देताच नेवासा-शेवगाव रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे.

नेवासा-शेवगाव व नेवासा-श्रीरामपूर राज्य मार्गावर मोठं मोठी खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा प्रश्न या रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना पडत आहे. रस्त्यातील खड्डे हुकविण्याच्या प्रयत्नांत अनेक अपघात होऊन काही प्रवाशांना जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आले. वाहनांचे ही अतोनात नुकसान होत आहे.

त्यामुळे या मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष, भारतीय जनता पार्टी व इतर संघटनांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने गणेशोत्वाचे मुहूर्तावर नेवासा-शेवगाव रस्त्याची दुरुस्ती हाती घेतली असून शेवगावकडे जाणाऱ्या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे कामाला नेवासा फाट्याकडून सुरू झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com