<p><strong>अहमदनगर|Ahmedagar</strong></p><p>घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील 46 हजार रूपये किंमतीचे सोन्या- चांदीचे दागिणे चोरीला गेले होते. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरीचा तपास लावत दोन महिलांकडून ते दागिणे हस्तगत करून संबंधीत महिलेला परत दिले.</p>.<p>6 सप्टेंबर रोजी पद्मानगरच्या शिवतेज चौकात राहत असलेल्या कविता सुनील जाधव (वय- 31) यांच्या घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी घरातील 46 हजार रूपये किंमतीचे सोन्या- चांदीचे दागिणे चोरून नेले होते. याप्रकरणी कविता जाधव यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड, पोलीस निरीक्षक हरूण मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील कर्मचार्यांनी या गुन्ह्याचा तपास करून किर्ती रोहीत गायकवाड (वय- 25 रा. तपोवन रोड, नगर) व पुनम रूपेश झोगडे (वय- 21 रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेले सोन्या- चांदीचे दागिणे हस्तगत केले. न्यायालयाच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या हस्ते कविता जाधव यांना सदरचे दागिणे परत देण्यात आले. तोफखाना पोलिसांच्या या कामगिरीचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.</p>