साई संस्थान विश्वस्त मंडळाची व्हायरल यादी अंतिम नव्हे - ना.थोरात

सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठी नियम सुधारणा
साई संस्थान विश्वस्त मंडळाची व्हायरल यादी अंतिम नव्हे - ना.थोरात

अहमदनगर | प्रतिनिधी

सामान्य साईभक्त कार्यकर्त्याला सेवेची संधी मिळावी यासाठी शिर्डी साई मंदिर विश्वस्त मंडळ (Shirdi Sai Temple Board of Trustees) नियमात काही माफक बदल केले आहेत....

हे बदल फार मोठे नाहीत. मात्र यामुळे ज्याच्याकडे या कामास देण्यासाठी वेळ आहे, अशा कार्यकर्त्याला संधी मिळेल अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी दिली. दरम्यान संस्थांची संभाव्य म्हणून माध्यमात आलेली यादी म्हणजे कल्पनेपलीकडे काही नाही, असेही ते म्हणाले.

साई संस्थान विश्वस्त मंडळाची व्हायरल यादी अंतिम नव्हे - ना.थोरात
मोदी सरकारने सामान्य जनतेची माफी मागावी

नगर (Ahmednagar) येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, जे विश्वस्त मंडळ अद्याप जाहीर झाले नाही, त्यातील नावे आधीच कशी चर्चेत आली? ज्याने यादी सोशल मीडियात व्हायरल (Viral on social media) केली, त्याने बरीच मेहनत घेतलेली दिसते. असा चिमटा त्यांनी काढला.

अध्यक्ष काँग्रेसचाच

विधानसभा अध्यक्ष (Speaker of the Assembly) काँग्रेसचा (Congress) होणार आणि नावाबाबत अंतिम निर्णय महाविकास आघाडीतील घटक पक्ष चर्चेतून ठरविणार, असे ना.थोरात यांनी निक्षून सांगितले. काँग्रेसकडे या पदासाठी सक्षम नेते आहेत, असे ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com