व्हॅनमध्ये गॅस भरताना झाला स्फोट

झेंडीगेट परिसरातील घटना
व्हॅनमध्ये गॅस भरताना झाला स्फोट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अनाधिकृतरित्या व्हॅनमध्ये गॅस (Gas) भरत असताना झालेल्या स्फोटात (Explosion) व्हॅन (Van) जळून खाक झाली. झेंडीगेट (Zendigate) परिसरातील महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) पाण्याच्या टाकीजवळ, सरोजा बाग (Saroja Bag) येथे गुरूवारी दुपारी ही घटना घडली. मनपाच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. यामुळे पुढील अनर्थ टळला.

दरम्यान या घटनेमुळे मनपाच्या पाणी टाकीच्या (Water Tank) सुरक्षेतचा प्रश्न पुढे आला आहे. त्या पाणी टाकीखाली अनाधिकृतपणे गॅस टाकीतून (Gas Tank) वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने गुरूवारी दुपारी झेंडीगेट येथील सरोजबाग (Sarojbag) येथे गॅस टाकीतून व्हॅनमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट (Explosion) झाला. यामुळे व्हॅनने पेट घेतला.

व्हॅन पूर्णतः आगीत जळून खाक झाली आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्यानंतर गाडीचे चारही टायर मोठमोठ्या आवाजात फुटले आणि आसपासचा परिसर हादरला. घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन गाडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Related Stories

No stories found.