करंजी (वार्ताहर) -

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील शंकर केशव हजारे (वय वर्ष 23) या तरुणाचा दौंड येथे 31 डिसेंबर रोजी मोटरसायकलवरून प्रवास करत

असताना अपघात घडला त्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाल्याने मिरी गावावर मोठी शोककळा पसरली आहे. शंकर हजारे याच्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे.

अतिशय होतकरू परंतु एका गरीब कुटुंबातील या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने मिरी गावासह परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या अंत्यविधीस मिरीसह परिसरातील तरुणवर्ग उपस्थित होता.