विहिरीत पडून शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

विहिरीत पडून शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू

सोनेवाडी |वार्ताहर| Chadeksare

कोपरगाव तालुक्यातील (Kopargav Taluka) चांदेकसारे (Chadeksare) येथील नऊ चारी परिसरात विद्युत मोटर (Water Pump) विहिरीत (Well) सोडत असताना वायररोप तुटून शेतकरी वाल्मीक कोंडाजी होन (वय 51) यांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. याबाबत घडलेली घटना अशी की रविवारी सायंकाळी सहा वाजेदरम्यान वाल्मीक होन यांनी मजुरांना (Worker) बरोबर घेत नऊचारी परिसरातील आपल्या शेतीमध्ये असलेल्या विहिरीवर (Well) विद्युत मोटर (Water Pump) टाकण्यासाठी गेले.

सध्या उन्हाळा (Summer) तीव्र असल्यामुळे शेती पिके (Crops) वाचवण्यासाठी धडपड करत असतांना ही दुर्दैवी घटना घडली. सध्या गोदावरी उजव्या कालव्याचे आवर्तन सुटले (Rotation of Godavari Right Canal) असून परिसरातील नऊ चारीला देखील पाणी आले आहे. चारीला पाणी आल्यानंतर होन यांच्या विहिरीची पाणी पातळी (Well Water Level) वाढते. त्यामुळेच त्यांनी या विहिरीवर विद्युत मोटर बसवण्याचे ठरवले. ट्रॅक्टरच्या साह्याने मजुरांना सोबत घेत ते या विहिरीत मोटर सोडत असताना विद्युत मोटरीचा पाईप तुटला (Pipe is Broken) गेला. पाईप तुटल्यामुळे मोटरला हीसका बसून पाण्यात अतिवेगाने गेली त्याचबरोबर होन यांच्या हातात असलेला वायररोपने आढी मारली त्या क्षणी ते पाण्यात पडले. पोहता येत नसल्यामुळे होन यांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. होन यांना वाचवण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या मजुरांनी प्रयत्न केले.

मात्र या मजुरांना देखील पोहता येत नसल्यामुळे त्यांचेही प्रयत्न असफल ठरले. घडलेल्या घटनेची माहिती वार्‍यासारखी गावात पसरली. माजी सरपंच केशवराव होन व पोलीस पाटील मिराताई रोकडे यांनी घडलेल्या घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला कळवली.कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे व पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढत शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com