केमिकल पावडर घेऊन जाणारा ट्रक उलटला

कुठे झाला अपघात?
केमिकल पावडर घेऊन जाणारा ट्रक उलटला

करंजी l Karanji

पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे बुधवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुंबईहुन परभणीकडे केमिकलची २६ टन पावडर घेऊन जात असलेल्या ट्रकचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने हा ट्रक एका धोकादायक वळणावर जाऊन उलटला.

सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी ट्रकमधील केमिकलच्या पावडरचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात ट्रक चालक हनुमंत तोंडे व हरीश मुंडे (राहणार माजलगाव) हे या अपघातातून सुदैवाने बचावले आहेत.

केमिकलची पावडर आहे हात लावू नका असे आव्हान अपघातग्रस्त ट्रक चालकाकडून प्रवाशांना करण्यात येत होते तरी देखील अनेक प्रवाशांना ही पिवळसर पावडर हातात घेवून पाहण्याचा मोह सोडला नाही.

नवरात्रातली सातवीमाळ असल्यामुळे मोहटा देवीच्या दर्शनाससाठी जाणाऱ्या भाविकांची रस्त्याने मोठी गर्दी असल्यामुळे अपघातग्रस्त ट्रकला पाहण्यासाठी व ट्रॅक्टरचे फोटो काढण्यासाठी अनेक प्रवासी या ठिकाणी वाहने बाजूला उभे करून थांबत असल्याने घाटात दिवसभर वाहतूक कोंडी होत होती.

Related Stories

No stories found.