टरबुजाचे पेमेंट मागितले म्हणून राहात्याचा व्यापार्‍याने दिली जिवे ठार मारण्याची धमकी

टरबुजाचे पेमेंट मागितले म्हणून राहात्याचा व्यापार्‍याने दिली जिवे ठार मारण्याची धमकी

राहुरी (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथील तरुण शेतकरी दत्तात्रय सिताराम खिलारी (वय 31) यांनी टरबुजाचे पैसे मागितल्याचा राग आल्याने टरबूज व्यापार्‍याने जिवे मारण्याची धमकी दिली.

शेतकरी दत्तात्रय सिताराम खिलारी यांनी त्यांच्या शेतातील टरबूज राहाता तालुक्यातील अस्तगाव फाटा परिसरात राहणारा व्यापारी अकबर शेख याला विकला. अकबर ने माल पेमेंट नंतर करतो असे सांगून तो माल घेऊन निघून गेला.

त्यानंतर अनेक दिवस पेमेंट मिळाले नाही म्हणून दत्तात्रय खिलारी यांनी व्यापारी अकबर शेख याला फोन करून माझ्या टरबुजाच्या मालाचे पेमेंट देऊन टाका, अशी विनंती केली. त्याचा व्यापारी अकबर शेख याला राग आला आणि त्याने शेतकरी दत्तात्रय खिलारी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. म्हणून शेतकरी दत्तात्रय खिलारी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात व्यापारी अकबर शेख याच्याविरुद्ध तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्री.जाधव हे करीत आहेत. या प्रकारामुळे शेतकर्‍यांनी कष्ट करुन काढलेला माल व्यापारी लोकांना विश्‍वासाने द्यायचा की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com