जिल्ह्यातील एकूण करोना बाधितांची संख्या ४९९७ वर
सार्वमत

जिल्ह्यातील एकूण करोना बाधितांची संख्या ४९९७ वर

आज दुपारपर्यंत २४ रुग्णांची भर

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४ ने वाढ झाली आहे. एकूण करोना बाधितांची संख्या ४९९७ इतकी झाली आहे.

आज बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९ (सिव्हिल हडको ०१, निर्मल नगर ०१, माळीवाडा ०१, पाईप लाईन रोड ०१, गुलमोहर रोड ०१, कायनेटिक चौक ०१, कासारवाडी पंपिग स्टेशन ०१, नगर शहर १, शिवाजीनगर कल्याण रोड ०१), नेवासा १३ (तरवडी ०१, कुकाणा ०१, जैनपुर ०३ पाचेगाव ०१, नेवासा फाटा ०२, सोनई ०१), जामखेड ०२ ( शहर ०१, डोण गाव ०१) अशा २४ रुग्णांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com