कोपरगाव तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 182 वर

110 रुग्णावर सध्या उपचार सुरू
कोपरगाव तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 182 वर

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

कोपरगाव शहरासह तालुक्यात आज सलग आठव्या दिवशी देखील करोनाचा कहर कायम असून आज 21 करोना बाधित आढळून आले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात काल सापडलेल्या 26 रुग्णांच्या संपर्कातील 102 व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 26 व्यक्तींचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यात एका व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे एकूण 21 रुग्ण आढळले आहे तर 107 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 182 झाली असून 110 रुग्णावर सध्या उपचार सुरू आहे. तर 2 रुग्णाचा दुर्देवी मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

पोहेगाव येथे चार करोना बाधित

सोनेवाडी | वार्ताहर | Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे काल सापडलेल्या करोनाबधिताच्या संपर्कातील अकरा लोकांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पोहेगावकरांची चिंता वाढली आहे. देर्डे चांदवड येथील बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे रक्ताचे नमुने तपासले असता त्यांचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नितीन बडदे यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com