सेफ्टी टँकमध्ये तिघे पडले; दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात कुठे घडली घटना?
सेफ्टी टँकमध्ये तिघे पडले; दोघांचा मृत्यू

अहमदनगर|Ahmedagar

शौचालयाच्या सेफ्टी टँकमधील मैला काढण्याचे काम सुरू असताना टँकमध्ये पडून घर मालकासह एका कामगाराचा मृत्यू झाला. तर एक कामगार जखमी झाला आहे. घर मालक साहेबराव भागाजी खेसे (वय 50 रा. निंबळक ता. नगर) व कामगार अरूण श्रीधर देठे (वय 38 रा. नागापूर) अशी मृतांची नावे आहेत. तर एक कामगार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नगर तालुक्यातील निंबळक शिवारात रविवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निंबळक मधील पांडूरंग नगर परिसरात साहेबराव खेसे यांचे घर आहे. त्यांच्या घरातील सेफ्टी टँक भरल्यामुळे त्यातील मैला काढण्यासाठी त्यांनी रविवारी दुपारी दोन कामगारांना बोलविले होते. टँकमधील मैला काढत असताना एक कामगार टँकमध्ये पडला. त्यापाठोपाठ दुसरा कामगारही टँकमध्ये पडला. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना मालक साहेबराव टँकमध्ये पडले. त्यातील एका कामगाराला बाहेर काढण्यात यश आले.

मालक साहेबराव व कामगार अरूण देठे यांचा यामध्ये मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती निंबळक शिवारात पसरल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळल्यानंतर सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

Related Stories

No stories found.