सीसीटीव्हीमुळे सापडला चोरटा

सीसीटीव्हीमुळे सापडला चोरटा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्डमधील महात्मा फुले चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेल्या रिक्षा चोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

महिन्यापूर्वी टीम 57 फॅमिलीच्या माध्यमातून हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मार्केट यार्ड येथून चोरट्यांनी रिक्षा चोरी केली. मात्र चोरटा रिक्षा चोरत असताना कॅमेरात कैद झाली. पोलिसांनी या कॅमेरा फुटेजची मदत घेऊन सूत्रे हलवली व चोरट्याला मुद्देमालासह जेरबंद केले. गरीब रिक्षाचालकाने आपले वाहन सापडल्यामुळे समाधान व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com