शेतकर्‍याला डांबून ठेवत दमबाजी

शिरूर तालुक्यातील निमोणे येथील घटना
शेतकर्‍याला डांबून ठेवत दमबाजी

शिरूर (तालुका प्रतिनिधी) / Shirur - शेतकर्‍याला पत्नीसह 10 ते 15 जणांनी तलवारीचा धाक दाखवत घरात डांबून ठेवले व अंदाजे 1 लाख 35 हजार रुपयांचे कोंबडीखाद्य चोरून नेल्याचा प्रकार निमोणे (ता. शिरूर) येथे घडला.

याबाबत अजय जवळकर (रा.म्हातोबाची आळंदी) याच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश साळुंखे हे आपल्या पत्नीसह निमोणे गावात दुर्गेवस्ती येथे राहतात. महिन्यापूर्वी त्यांनी अजय जवळकर याच्याकडून कोंबड्यांसाठी खाद्य आणले होते. परंतु त्याचे पैसे देणे बाकी होते. बुधवारी (दि 8) दोन व्यक्ती पैसे मागण्यासाठी आले.

त्यावेळी साळुंखे यांनी पैसे नंतर देतो असे सांगितले. यावेळी अजय जवळकर याने दमदाटी केली व निघून गेला. रात्री साडेअकराला जवळकर 10 ते 15 साथीदारांसह पुन्हा साळुंखे यांच्या घरी आला. पोल्ट्रीमध्ये काम करणार्‍या कामगारास आरोपींनी मारहाण केली. आरडाओरडा ऐकून साळुंखे यांची पत्नी बाहेर आली.

यावेळेस जवळकर याने त्यांच्या गळ्यातील 4 तोळ्याचे गंठन हिसकावून घेतले. नंतर घराला कडी लावून साळुंके-पती-पत्नीला कोंडून घेतले.कडी लावत दोन्ही पती-पत्नीला कोंडून घेऊन 1 लाख 35 हजारांचे खाद्य चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक विक्रम जाधव करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com