राज्य सरकारने साई मंदिर खुले करून अर्थकारणाला गती द्यावी - कोल्हे

राज्य सरकारने साई मंदिर खुले करून अर्थकारणाला गती द्यावी - कोल्हे
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव (प्रतिनिधी) - शिर्डी व पंचक्रोशीतील हजारो कुटूंबांचा रोजगार शिर्डीच्या साईमंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर उघडल्याशिवाय अनेक कुटूंबांची रोजीरोटी सुरू होणार नाही, मोठया प्रमाणात आर्थीक घडी विस्कटलेली असुन अनेक कुटूंबांची उपासमार होत आहे. त्यामुळे राज्यसरकारने शिर्डीचे साईमंदिर खुले करून शिर्डी व परिसरातील अर्थकारणाला गती दयावी, अशी मागणी भाजपाच्यळ प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.

सौ. स्नेहलता कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे, करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शिर्डीचे साईमंदिर सुमारे बंद होते, मध्यतंरीच्या काळात लॉकडाउन उठविण्यात आल्याने बर्‍याच दिवसांनी मंदिर सुरू झाले. परंतु पुन्हा लॉकडाउन झाल्याने मंदिर बंद झाले. त्यामुळे शिर्डीच्या अर्थकारणाला खिळ बसली असुन शिर्डी व परिसरातील हजारो कुटूंबांचा रोजगार बंद झाला आहे. लॉकडाउन काळात बंद असलेल्या मंदिरामुळे या व्यवसायातील अनेक बेरोजगार झाले. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मोठया प्रमाणात असलेल्या शिर्डीत अनेकांवर कर्जाचा बोजा पडला आहे.

सध्या करोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली असुन लसीकरणाची मोहिमही सुरळीत सुरू आहे. रूग्णसंख्या कमी होत आहे, यामुळे नागरीकांसाठी दिलासादायक परिस्थिती आहे. हातावर पोट असलेले अनेक व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, फुल मार्केट, रिक्षा-टॅक्सीचालक तसेच छोटेमोठे दुकानदार मंदिर बंद असल्यामुळे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सर्वसामान्याचे जगणं असहाय झाले असुन पैशाची तजवीज कशी करावी ही समस्यां भेडसावत आहे. राज्यसरकाने गांभीर्याने विचार करून शिर्डीचे साईमंदिर तातडीने खुले करून शिर्डीच्या अर्थकारण सुरळीत करण्याची प्रयत्न करावेत, अशी मागणी सौ.कोल्हे यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com