दुकाने सुरू करू द्या

व्यापार्‍यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
दुकाने सुरू करू द्या
संग्रहित

अहमदनगर (प्रतिनिधी) - आयुक्तांनी दुकाने सुरू करण्याची परमीशन दिल्यानंतर अनेक व्यापार्‍यांनी माल खरेदी केला असून तो घेऊन मालमोटारी नगरला निघाल्या आहेत.

हा माल जीवनावश्यक असल्याने तो उतरून घेण्यासाठी तरी दुकान उघडण्याची परवानगी द्या, अशी मागणी आडतेबाजार व्यापारी संघटनेने आयुक्तांकडे केली आहे. शहरातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी झाला आहे. त्यामुळे दुकाने नियमीत सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नगर शहरातील घाऊक व किरकोळ किराणा भुसार व्यापार करण्याकरिता शनिवारी दिलेली परवानगी रविवारी आयुक्तांनी रद्द केली. परराज्यातून, तसेच स्थानिक शेतकर्‍यांनी माल विक्री करिता शहरात पाठविला आहे. येणारा माल नाशवंत व जीवनावश्यक असून तो उतरवून घेणे फार आवश्यक आहे. लॉकडाऊन 1जूनपर्यंत असल्याने इतके दिवस माल वाहनामध्ये ठेवणे किंवा इतके दिवस ट्रक थाबवून घेणे शक्यच होणार नाही.

माल उतरवून घेण्याकरिता दुकान उघडण्याची परवानगी द्यावी. नगर शहरात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे अहमदनगर शहरातील अत्यावश्यक सेवेतील किराणा व्यापार्‍यांना सकाळी 7 तेसंध्याकाळी 5 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. जिल्ह्यातील ज्या गावामध्ये रुग्ण जास्त असतील तेथे लॉकडाऊन करावा, अशी मागणी व्यापारी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com