मराठा क्रांती ठोक मोर्चाशी संबंध नाही
सार्वमत

मराठा क्रांती ठोक मोर्चाशी संबंध नाही

प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली माहिती

Sarvmat Digital

देवगड फाटा | वार्ताहर

उद्या होणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलनाशी माझा व कुटुंबाचा काहीही संबंध नाही असे स्व. काकासाहेब शिंदे यांचे बंधू अविनाश शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

शिंदे यांनी पत्रकात म्हंटले आहे, " 29 जून रोजी कायगाव येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदधिकाऱ्यानी मला कुठलीही माहिती न देता स्व. काकासाहेब दत्तात्रय शिंदे यांच्या पुतळ्याला केवळ अभिवादन करण्यासाठी बोलावले होते. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक यांनी फोन करून सांगितले की, मराठा आरक्षणामूळे एमपीएससी'मध्ये निवड व हायकोर्टात 16 टक्के आरक्षण मान्य झाल्याने कायगाव येथे स्व. काकासाहेब शिंदे यांना पुष्पहार व अभिवादन करण्यासाठी दुपारी साडे अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान यावे. यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे केवळ चार ते पाच पदधिकारीच उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी स्व. काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यास्थळी गेलो असता त्या ठिकाणी औरंगाबादच्या पत्रकारांसह संबधित मोर्चाचे पदधिकारी उपस्थित असल्याचे दिसले व त्यांनी मिडीयाला मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या 23 जुलैच्या आंदोलनाबाबत माहिती दिली. वास्तविक पाहता मला त्यांनी आंदोलनाच्या ईशाऱ्यासाठी हे सर्व केले याची काहीही कल्पना नव्हती. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या प्रस्तावित 23 जुलैच्या आंदोलनाशी माझा काहीही संबंध नाही." असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com