सोनईत ‌‌वाढती गुन्हेगारी; भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने हल्ला

सोनईत ‌‌वाढती गुन्हेगारी; भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने हल्ला

गणेशवाडी | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील सोनई बसस्टँड येथे भरदिवसा युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. सोनई येथे अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू असून पोलीस प्रशासनाचा दरारा नसल्याने असे प्रकार घडतांना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. 26) रोजी दुपारी 3.15 वाजेच्या दरम्यान राहील उर्फ मोईन रफिक अत्तार व सना राहील उर्फ़ मोईन अत्तार हे सोनई बसस्टँड येथे करदोटे विकत असताना त्या ठिकाणी दिपक फ्रांन्सीस काकडे (रा. सोनई) याने राहील उर्फ़ मोईन अत्तार यास दमदाटी व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तु माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघतोस काय. असे म्हणत राहील अत्तार या युवकावर हल्ला करत जखमी केले.

आता तुला मि जिवंत सोडणार नाही. असे बोलत असताना आरोपी दिपक काकडे याने आपल्या खिशातून धारदार चाकु काढून राहील उर्फ़ मोईन अत्तार याच्या अंगावर वार करत जखमी केले. सदर घटनेतील आरोपीस सोनई पोलीसांनी काही वेळातच अटक केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com