चोऱ्यांचे सत्र थांबेना; एकाच रात्री आठ दुकाने फोडली

चोऱ्यांचे सत्र थांबेना; एकाच रात्री आठ दुकाने फोडली

शेवगाव l शहर प्रतिनिधी

शेवगाव शहर व तालुक्याच्या ग्रामीण परिसरात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेले चोऱ्यांचे सत्र थांबता थांबत नसून या आधी घडलेल्या गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेस अपयश आल्याने ग्रामस्थ नागरीकातून संतापाचे वातावरण तयार झाले आहे.

शहरातील पैठण हमरस्त्यावरील जवळजवळ असलेल्या वेगवेगळ्या सात ते आठ दुकानाचे शटर उचकटून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांच्या टोळीने चोरून नेल्याची घटना विजया दशमीच्या रात्री घडली. त्यामुळे परीसरात खळबळ उडाली आहे.

शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हमरस्त्यावरील चोरीच्या घटनेमुळे छोटे व्यावसायिक व नागरिकात चिंतेचे व घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com