जॉगिंग ट्रॅक बुडाला डबक्यात

जॉगिंग ट्रॅक बुडाला डबक्यात

अहमदनगर | प्रतिनिधी

सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान सध्या पाण्याचे डबके आणि घाणीच्या साम्राज्यात हरवला आहे. महापालिकेने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे.

सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदानावर ज्येष्ठ नागरिक, महिला, युवकांची मोठी वर्दळ असते. सदर मैदानामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अद्यापही नागरिकांसाठी शौचालय उपलब्ध नाही. पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. पावसाचे पाणी मैदानामध्ये साचते. सर्वत्र गवत वाढले आहे. त्यामुळे सदर मैदानात डास उत्पत्ती मोठ्या प्रमाणात आहे.

महापालिकेने समस्यांचे निराकरण करावे अशी मागणी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केली आहे यावेळी शुभम तारळकर, अक्षय मिरपगार, अमर सैंदर, अथर्व घुले, ऋषीकेश खटावकर, बबलु गुलदगड, विक्की मोरे, सुरज ठोकळ, ऋग्वेद कुलकर्णी, गणेश चापे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com