सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांची सुरक्षा रामभरोसे

बाहेरून येणार्‍या कामगारांच्या जीवावर कंपन्या सुरू : प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष
सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांची सुरक्षा रामभरोसे

सुपा (वार्ताहर) - सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये कमी जास्त प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरू असून या ठिकाणी बाहेरून येणार्‍या कामगारांमुळे सर्वांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. सरकारच्या कारखान्यांत निवासी असणार्‍या कामगारांना कामावर ठेवून उद्योग सुरू ठेवण्याच्या नियमाला या ठिकाणी हरताळ फासण्याचा प्रकार असल्याचे दिसत आहे. संबंधीत कंपनीसोबत कामगारांची सुरक्षा आतार राम भरोसे असल्याचे दिसत आहे.

वाढत्या करोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. मात्र, ज्याठिकाणी कंपनीत कामगारांच्या निवासाची व्यवस्था असेल, त्याच कंपन्या सुरू ठेवण्यासोबतच बाहेरून कामगार यांना बोलावून कंपनी सुरू ठेवण्यास राज्य सरकारने सोबत जिल्हा प्रशासनाने मनाई केलेली आहे. असे सक्त आदेश असतांना सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये मात्र सध्या सर्रासपणे सर्व कंपन्या सुरू असून कामगार शिफ्टनूसार घरून कामांवर जातांना दिसत आहे. हे कामगार कामावरून घरी जाताना अथवा कामावर येतांना बाजारपेठ, बँका या ठिकाणी हजेरी लावतांना दिसत आहे. त्यानंत कारखान्यांत मोठ्या संख्याने एकत्र येत काम करत आहेत. यामुळे करोना संसर्गाचा धोका वाढला आहे.

करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने खासागी आस्थपना 31 मे बंद ठेवण्यासोबतच शासकीय कार्यालयात 15 उपस्थिती सक्तीचे केलेली आहे. मात्र, सुपा औद्योगिक वसाहतीमधील चित्र काही वेगळेच आहे. या ठिकाणी महिला आणि पुरूष कामगार घरून अथवा लांबवरून याठिकाणी कंपनीमध्ये कामावर येतांना दिसत आहे. पुण्यानंतर सुपा औद्योगिक वसाहतीचा झपाट्याने विकास होत आहे. दुध, पाणी, आटा, बेकरी, खाद्य पदार्थ, साँनिटायझर या गरजेच्या वस्तूंसह ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, बांधकाम साहित्य, शेती औजारे, बनवणार्‍या कंपन्या आणि वर्कशॉप या ठिकाणी कार्यरत आहेत. सुप्यातील बहुतांशी कंपन्यांनी कामगारांच्या निवासाची व्यवस्था नाही. त्यामुळे हे कामगार वेगवेगळ्या ठिकाणाहून कंपनीत एकत्र येतात व सुट्टी झाल्यावर आपआपल्या घरी जातात. यामुळे करोनाचा समुह संसर्गाचा मोठा धोका या ठिकाणी आहे.

येथील काही कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी कामगारांच्या करोना टेस्ट केल्या होत्या. तेव्हा मोठ्या संख्येने कामागरांना लागण झाल्याचे समोर आले होते. कंपनीतही कामगारांच्या सुरक्षेत दुर्लक्ष असून गेटमधून आत येतांना कामगारांचे तापमानासह अन्य तपासण्या होत नाहीत. मुळातच जेथे कंपन्यांना कामगारांच्या रहाण्याची व्यवस्था आहेत, अशाच कंपन्या चालू ठेवण्याचे आदेश असताना. या ठिकाणच्या बहुतांशी कंपन्या बाहेरून कामगारांना बोलवत आहेत. यामुळे येथील कामगारांची आरोग्य सुविधा रामभरोसे असल्याचे दिसत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com