अनेक दिवसापासुन बंद असलेला रस्ता 'महसूल सप्तपदी अभियान' अंतर्गत सुरु

अनेक दिवसापासुन बंद असलेला रस्ता 'महसूल सप्तपदी अभियान' अंतर्गत सुरु

अस्तगाव | वार्ताहर

राहाता तालुक्यातील अस्तगावच्या चोळकेवाडी येथील गट नं.103 लगत असलेला शिवार वाहतुकीचा रस्ता अनेक दिवसापासुन बंद झालेला होता. अनेक दिवसापासुन बंद झालेला हा रस्ता 'महसूल विजय सप्तपदी अभियान' अंतर्गत सुरु झाला आहे.

यापुर्वी या रस्त्या शेजारील शेतकर्‍यांशी चर्चाकरुन खुला करण्याबाबत अनेक वेळा प्रयत्न करण्यात आला होता. काल चोळकेवाडी येथील साईराज मिल्क (चोळके दुध) शेजारील गट नं.103 मधील शिवार वाहतुकीचा बंद पडलेला रस्ता खुला करण्यासाठी शेजारील शेतकर्‍यांशी चर्चा करण्यात आली व रस्ता खुला करण्याबाबत विनंती करण्यात आली.

त्यामुळे आज जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली सप्तपदी अभियान अंतर्गत हा रस्ता मोकळा करण्यात आला. रस्ता खुला झाल्यामुळे परिसरातील शेतकर्‍याची दळणवळणाची सोय झाली आहे. तसेच परिसरातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रस्ता खुला करण्यासाठी उपविभागीय अधिकारी बाजीराव शिंदे व राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांचे मार्गदर्शन मिळाले.

यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्विय साहायक प्रमोद रहाणे, मंडळधिकारी जगन्नाथ भालेकर, सरपंच नवनाथ नळे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मगर, चोळकेवाडीचे पोलीस पाटील प्रदिप चोळके, मोरवाडीच्या पोलिस पाटील निता मोरे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजुरकर, माजी सरपंच नंदकुमार गव्हाणे, आर. बी. चोळके, संजय चोळके, केशवराव चोळके, कुडंलिक तरकसे, ज्ञानदेव चोळके, सुनिल चोळके, पाडुरंग नळे, राजेंद्र पठारे, ज्ञानदेव नळे, राहुल पोळके, सतिष नळे, भाऊसाहेब नळे, तुकाराम नळे, पवन नळे, रविंद्र नळे, सचिन चोळके, नामदेव नळे, कुंडलिक नळे, बाळासाहेब नळे, प्रमोद मोरे, संदिप नळे, राजेंद्र नळे, सचिन जेजुरकर, आण्णासाहेब मोरे, विजय चोळके, चंद्रभान गोर्डे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com