तळेगाव दिघे बाजार तळानजीकचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा!

सिमेंट वाहतूक करणारा टँकर अपघातग्रस्त
तळेगाव दिघे बाजार तळानजीकचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा!

तळेगाव दिघे l वार्ताहर

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजार तळानजीकच्या अपघाती पुला दरम्यान पुन्हा एक सिमेंट वाहतूक करणारा टँकर समोरून आलेल्या वाहनाने हूल दिल्याने रस्त्याच्याकडेला घुसून अपघातग्रस्त झाला. लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे गावानजीक शुक्रवारी रात्री १२.३० च्या सुमारास अपघाताची ही घटना घडली.

तळेगाव दिघे बाजार तळानजीक असलेल्या अरुंद पूल व अपघाती 'मुत्युघंटा' वळण रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे. या धोकादायक ठिकाणी केव्हाही व कधीही अपघात घडू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पुणे येथील एका कंपनीच्या मालकीचा सिमेंट वाहतूक करणारा टँकर (क्र. एमएच १२ क्यूडब्ल्यू ८७३८) घेवून चालक आकाश अरुण चव्हाण हा लोणीच्या दिशेने जात होता. दरम्यान रात्रीच्या सुमारास सदर सिमेंट वाहतूक करणारा टँकर चिंचोली गुरव फाटा रस्त्यानजीक असणाऱ्या दिशादर्शक सिमेंट बांधकामास धडकून थेट बाजार तळानजीकच्या अपघाती पुलादरम्यान रस्त्याच्या कडेला घुसून अपघातग्रस्त झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सदर सिमेंट वाहतूक करणारा रिकामा टँकर नाशिक येथून सोलापूर येथे आपण घेवून चाललो होते, मात्र तळेगाव दिघे पुला दरम्यान रस्त्यावर असे चालक आकाश चव्हाण यांनी सांगितले. तळेगाव दिघे बाजार तळानजीकचा अपघाती वळण रस्त्यावर तसेच अरुंद पुला दरम्यान वारंवार अपघाताच्या घटना घडत असून शुक्रवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास फुला दरम्यान सिमेंट वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या कडेला घुसून अपघातग्रस्त झाला.

याठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत असून आणखी एखादी मोठी अपघाताची घटना घडल्यावर व एखाद्याचा अपघाती बळी गेल्यावर राष्ट्रीय महामार्ग विभाग लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित करीत सदर अपघाती वळण रस्ता व दरम्यानच्या धोकादायक अरुंद पुलाची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बी. सी. दिघे, युवक कार्यकर्ते अमोल दिघे सहित ग्रामस्थांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com