<p><strong>टाकळीमिया | वार्ताहर | Takalimiya </strong></p><p>नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी विरोधी कायद्या विरूद्ध सुरू असलेल्या शेतकरी अंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहेत. राहुरी तालुक्यातील </p>.<p>टाकळीमिया येथे मंगळवार दि.1 डिसेंबर रोजी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली अंदोलन करून केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या अंदोलनास पाठींबा देत महाराष्ट्रात आक्रमक भुमिका घेतली आहे. सरकारने हा कायदा मागे घेतला नाही तर महाष्ट्रातच्या प्रत्येक खेड्यापर्यंत हे अंदोलन केले जाईल असा इशारा रविंद्र मोरे यांनी यावेळी दिला आहे. या आंदोलनास टाकळीमियासह तालुक्यातील व इतर भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.</p>