नातलगानेच दाबले चार तोळे

तोफखान्यातील महिलेची पोलिसांत तक्रार
नातलगानेच दाबले चार तोळे

अहमदनगर (प्रतिनिधी) - विश्‍वास संपादन करत औरंगाबादच्या पाहुण्यांनीच चार तोळे सोने आणि दोन नव्या साड्या नेल्या. मात्र त्या परत केल्याच नाही. आता हा ऐवज परत मिळावा यासाठी तोफखान्यातील महिलेने पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिसांनी औरंगाबादच्या त्या नातलगाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ललीत कानिफनाथ लकडे त्याची पत्नी साक्षी (रा. पुंडलिकनगर, जालना रोड, औरंगाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वैशाली प्रशांत धोत्रे (रा. बागडपट्टी, तोफखाना) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 15 फेब्रुवारी 2020 रोजी ही घटना घडली. काल मंगळवारी रात्री तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

धोत्रे आणि लकडे हे एकमेकांचे नातलग आहेत. नगरमध्ये आल्यानंतर त्यांनी धोत्रे यांच्याघरी चहापाणी केले. चुलत भावाचे पुण्यात लग्न आहे. तिकडे जायचे आहे. सोने, साडी औरंगाबादच्याच घरी राहिले. लग्नात वापरण्यासाठी सोने द्या अशी गळ लकडे दाम्पत्याने धोत्रे यांना घातली. मोठ्या विश्‍वासाने धोत्रे यांनी लकडे यांना साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळ्याची ठुशी आणि दोन नव्या साड्या दिल्या. लकडे नेलेले ऐवज परत करतील या आशेवर धोत्रे होत्या. मात्र पाहुणे असलेल्या लकडे यांनी धोत्रे यांच्याकडून घेततेले सोने, साड्या परत केल्याच नाहीत. देतो, असे म्हणून ते वेळ काढताहेत. त्यामुळे धोत्रे यांनी पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com