पाऊस थांबला, गोदावरीचा विसर्ग बंद

जायकवाडीत १२ हजार क्युसेकने आवक तर १८ हजार क्युसेकने विसर्ग
पाऊस थांबला, गोदावरीचा विसर्ग बंद
File Photo

राहाता (तालुका प्रतिनिधी)

गंगापूर धरणाच्या पाणलोटात पाऊस मंदावल्याने या धरणाचा विसर्ग परवा दुपारनंतर बंद करण्यात आला. दारणाचा १९०४ क्युसेकवर आला. त्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत पडणारा विसर्ग काल दुपारी १२ वाजता बंद करण्यात आला आहे.

१ जूनपासून काल सकाळी ६ पर्यंत गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने २०. ८ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. खाली जायकवाडीत काल संध्याकाळी ८ वाजता १२ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. तर या धरणातून १८ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

जायकवाडी जलाशयात तीन दिवसांपूर्वी लाखाहून अधिक क्युसेकने पाण्याची आवक होत होती. त्याप्रमाणात विसर्ग करण्यात आला. काल सकाळी ६ वाजता मागील २४ तासांत जायकवाडीत टिएमसी पाण्याची आवक झाली. तर १ जून पासून सुमारे ६५ टिएमसी पाणी नव्याने या धरणात दाखल झाले. काल संध्याकाळी ८ वाजता जायकवाडीत ९९ टक्के पाणीसाठा होता.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी धरणांचा साठा १०० टक्के झाला आहे. काल दिवसभरात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे दारणातून सकाळी सहा वाजता ११०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. हा विसर्ग नंतर काहिसा वाढवून १९०४ क्युसेकवर करण्यात आला. विसर्ग परवा गगापूरचा ४ वाजता बंद करण्यात आला.

नांदूरमधमेश्वच्या दिशेने काल उशीरापर्यंत फक्त दारणा १९०४, वालदेवी १८३, व आळंदी १२० क्युसेकने विसर्ग सुरू होता. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत करण्यात आलेला विसर्ग बंद करण्यात आला . आहे. गोदावरीत १ जून पासून काल सकाळी ६ पर्यंत २ लाख ४१ हजार ५३८ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. म्हणजेच २०.८ टिएमसी पाणी जायकवाडीकडे वाहून गेले.

धरणातील साठे असे दारणा, गंगापूर, भाम, भावली, वालदेवी, गंगापूर, कडवा, आळंदी ही धरणं १०० टक्के भरली आहेत. तर मुकणे ७५.३६ टक्के, वाकी ९२.१७ टक्के, कश्यपी ९७.६२ टक्के, गौतमी गोदावरी ९९.३६ टक्के, असे साठे आहेत.

Related Stories

No stories found.